दरम्यान, संबंधित रस्त्यावर खोल खड्डे पडलेले असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता उंच-खोल असल्यामुळे किंवा खड्डा चुकविताना वाहनचालकांचा तोल जाऊन कंटेनरला धडकण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधत तातडीने कंटेनर हटवून रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.


0 Comments