मावळ जनसंवाद:- नाणे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लढ्याचा एल्गार करत मराठा समाजबांधवांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या मोर्चाचे नेतृत्व मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील करणार असून, त्याच्या पार्श्वभूमीवर नाणे मावळातील व ग्रामीण मराठा समाजबांधवांची नियोजन बैठक गोवित्री येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज पादुकास्थान येथे उत्साहात पार पडली.
या बैठकीत मोर्चा यशस्वी होण्यासाठी नियोजन, प्रचार आणि मराठा समाजाच्या व्यापक सहभागावर भर देण्यात आला. विशेषतः मावळ तालुक्यातील सर्व मराठाबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार, तालुक्यातील प्रमुख केंद्र कान्हे फाटा येथे एकत्रित बैठक होणार असून, त्यासाठी समाजबांधवांमध्ये जागृती मोहीम राबविण्यात येणारआहे. बैठकीत बोलताना काही वक्त्यांनी २९ ऑगस्टचा मोर्चा हा मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी निर्णायक ठरणार असून, राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्याच्या दृष्टीने तो महत्त्वपूर्ण टप्पा असेल, असे मत व्यक्त केले. होत असलेल्या मराठा मोर्चाला सर्व स्तरावरून पाठिंबा दर्शवत आहे त्या अनुषंगाने सर्व मराठी बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.
0 Comments