Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

रस्त्यात मोठमोठे खड्डे; वाहनचालक त्रस्त, अपघातांची शक्यता वाढली...

मावळ जनसंवाद:- नाणे मावलातील मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून, या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
          कामशेत-जाभवली या परिसरात रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. दररोज शेकडो वाहने या रस्त्यावरून धावतात. मात्र खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान आणि अपघातांची शक्यता वाढली आहे. 



स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. "रोजच एखादा दुचाकीस्वार घसरतो. रात्रीच्या वेळी तर या खड्ड्यांचे भय अधिकच वाढते," असे स्थानिक रहिवासी संतोष विष्णू गायकवाड यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments