मावळ जनसंवाद:- कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नाणे मावळ परिसरामध्ये भात कापणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे सर्व शेतकरी कापणीच्या कामामध्ये मग्न झाले आहेत.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश्य परिस्थितीमुळे भात कापणीच्या वेळेलाच नेमका काही दिवस पावसाने संततधार सुरू केल्यामुळे मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाले होते. त्यामुळे पाऊस थांबण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना निर्माण झाली होती, परंतु गेले आठवड्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीच्या कामाला सुरुवात केली.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण असून कापणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये भातकापणी करून सायंकाळच्या वेळी पेंड्या बांधून झोडणीकरिता शेतकरी सज्ज झाले आहेत.
कोंडीवडे ना. मा. परिसरामध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कापणीच्या कामाला वेग आला असून शेतातील भात कापून सुकण्यासाठी असे पसरवण्यात आले आहे.


0 Comments