Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

गोल्डनचे जेष्ठ व आदर्श शिक्षक धावणे सर यांचा गौरव, २७ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती

मावळ जनसंवाद:- करंजगाव (ता. मावळ) – गोल्डन ग्लेडस एज्युकेशन सोसायटी संचलित गोल्डन ग्लेडस माध्यमिक विद्यालय, करंजगाव येथील जेष्ठ शिक्षक आणि माजी मुख्याध्यापक श्री.शंकर रामचंद्र धावणे सर यांचा गौरव करण्यात आला. २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले असून, संस्थेचे ते पहिले सेवानिवृत्त कर्मचारी ठरले आहेत.धावणे सरांनी शाळेच्या जडणघडणीत एक कुशल अभियंता आणि कार्यतत्पर शिक्षक म्हणून मोलाचे योगदान दिले. त्यांनी शाळेला मान्यता मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि जून १९९८ पासून ६ जानेवारी २००१ पर्यंत मुख्याध्यापक म्हणून कार्य केले. त्यानंतर त्यांनी सहशिक्षक म्हणून कार्य करताना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली.गणितावरील प्रभुत्व, अध्यात्मिक अभिरुची, आणि आधुनिक ज्ञानाची ओढ यामुळे ते शिक्षकांमध्ये आदरणीय स्थान मिळवून गेले. त्यांचे स्पष्टवक्तेपणा, परखड विचार आणि करडी शिस्त ही त्यांची वेगळी ओळख ठरली. विद्यार्थ्यांसाठी ते हक्काचे मार्गदर्शक ठरले, तर सहकाऱ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. धावणे सरांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून २०२१ साली राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारही प्राप्त झाला होता.शाळेच्या वाढीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले असंख्य विद्यार्थी आज देश-विदेशात यशस्वी जीवन जगत आहेत.

                      सर्व आजी व माजी विद्यार्थी गोल्डन ग्लेड्स माध्यमिक विद्यालय 
                          करंजगाव धावणे सरांना मानपत्र देताना ठीपलेले फोटो

२९ सप्टेंबर २०२५ रोजी शाळेच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी सर्व आजी-माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. “धावणे सर शाळेत असोत वा नसोत, ते आमच्या हृदयात सदैव असतील. त्यांचे जीवन यशोगंधाने दरवळत राहो,” अशा शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या.


Post a Comment

0 Comments