Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

नाणे नाणे मावळातील डोंगराने पांघरला हिरवा शालू कडेकपारीसह शेतशिवारे बहरली; बांधारे, ओढे खळखळले...!

मावळ जनसंवाद:- मावळ तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून सतत पडत असलेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या पेरण्या अथवा भात लागवड अजून देखील झालेली नाही सतत पडत असलेल्या पावसामुळे काही शेतकरी बांधवांना पेरण्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे दुसरी गोष्ट काही ठिकाणी भात रोपे ही पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. नाणे मावळात पावसाची रिमझीम सुरूच असल्याने काही ठिकाणी भातरोपे हे पीक जोमात आहेत. नाणे मावळातील असणारे बंधारे अथवा ओडे नाले हे खळखळून वाहू लागले आहेत. कडेकपारीसह शेतशिवारे बहरली असल्याने अवघ्या नाणे मावळ्याने हिरवा शालू पांघरल्याचा भास होत आहे.यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्याने काही ठिकाणी खरीप पेरण्यांना पूरक ठरला. बहुतांशी भागात पावसाने जोरदार हजेरी लावून काही शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा संपवली. 

काही शेतकरी सतत पडत असलेल्या पावसामुळे हातबल झालेला आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या ओलीवर लगबगीने खरीप हंगामातील खरीपाची पेरणी पूर्ण केली. पेरणी सततच्या सरींमुळे शेतकरी उभ्या पिकातील तदरम्यान, मावळ तालुक्यात सततच्या रिमझिम तर कधी जोराच्या पावसाने माळरान, डोंगर रांगा हिरव्या शालूने नटल्या आहेत. वन खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या क्षेत्रातील वृक्षांना ही पावसाने झळाळी आली आहे.  नाणे मावळाला वरदान असलेली इंद्रायणी नदी पात्रात सोडलेले पाणी व अधूनमधून बरसणारा पाऊस यामुळे नाणे मावळ पुन्हा पाणीदार होण्याचे स्वप्न साकारत आहे. परिणामी नाणे मावळातील काही गावांमध्ये एप्रिल मे महिन्यात पाणी नसते आणि हे पाणी आणण्यासाठी वन वन करावी लागते. यंदा मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे एप्रिल मे महिन्यातील दुष्काळी गावांना कलंक काहीसा पुसला जाईल अशा अंदाजाने सामान्य नागरिक सुखावले आहेत. पेरणीनंतर पावसाने ओढ दिल्यावर भौगोलिक विषमतेबरोबरच पर्जन्यमानही विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण होते; मात्र सततच्या रिमझिम तर कधी मोठ्या पावसाने पशुपालकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.


Post a Comment

0 Comments