मावळ जनसंवाद:- कोंडीवडे ना.मा (नाणे मावळ) येथील कांब्रे ते कोंडीवडे ना.मा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, काही ठिकाणी रस्ता खचला असून, पावसामुळे या खड्क्यांमध्ये पाणी साचत आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावर वाहनचालकांना जीवघेणी कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊल रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ, वाहन चालकांमधून जोर धरू लागली आहे.
विशेषतः कांब्रे ते कोंडीवडे ना.मा या दरम्यान रस्त्याची अवस्था विकट झाली आहे. या रस्त्यावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी मोठ्या संख्येने या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. रस्त्यावरील खड्डे चुकवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. पावसाळ्यात रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. चारा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा रस्ता डोकेदुखी ठरला आहे. संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील, अशी मागणी करण्यात येत आहे.
0 Comments