Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

नाणे गेट ते जांभवली मुख्य रस्ता सापडला खड्ड्यांच्या विळख्यात....!

मावळ जनसंवाद:- नाणे गेट ते जांभवली दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला. रस्त्याची अवस्था अक्षरशः मृत्यूचा सापळा बनली. खोल खड्‌ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांत नाराजी पसरली आहे.सदरील मार्गावरून दररोज शेकडो वाहने, पर्यटक, शालेय वाहने, शेतकरी, व्यापारी, यांचा या रस्त्यावरून नेहमीच वावर असतो. 


मात्र रस्त्यावरील मोठ्या खड्‌ड्यांमुळे प्रवास अडचणीचा व धोकादायक बनला आहे.विशेषतः पावसाच्या दिवसांत खड्डे पाण्याने भरल्याने अपघातांची शक्यता दुपटीने वाढली.मात्र रस्त्याची दयनीय अवस्था पाहता मोटार वाहन चालकांनाही खड्डे चुकविता येत नाहीत. परिणामी अनेक दुचाकी घसरणाऱ्या घटना घडल्या असून प्रवाशांना किरकोळ व गंभीर दुखापतींचा सामना करावा लागला आहे. अपघातांमुळे शालेय विद्यार्थी, वृध्द, महिला यांचे हाल होत आहेत. नाणे गेट ते जांभवली या रस्त्याचे दरम्यान तातडीने डांबरीकरण करावे, तसेच सर्व प्रथम खड्ड्यांवर तात्पुरती भर घालून वाहतुकीस सुलभता मिळवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

(काही ठिकाणी अर्धवट डांबरीकरण,अथवा सिमेंट काँक्रिटीकरण प्रशासनाचे दुर्लक्ष नाणे गेट ते जांभवली दरम्यानचे डांबरीकरण पूर्ण झाले असले तरी नाणे गेट ते जाभवली दरम्यानचा काही ठिकाणीचा रस्ता अजूनही उखडलेल्या अवस्थेत आहे. चिखल, खड्डे आणि अपूर्ण कामामुळे या मार्गावरून जाणे म्हणजे संकटाला निमंत्रण देण्यासारखे आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, हे अर्धवट डांबरीकरण, सिमेंट काँक्रेट म्हणजेच प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचे जिवंत उदाहरण आहे.)


Post a Comment

0 Comments