Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

सांडपाण्याच्या दुर्गधीने नागरिक हैराण..!


 मावळ जनसंवाद :-  
              कामशेत येथील  जुना  पुना- मुंबई  रस्त्यालगत (नाणे रोड रस्त्याच्या बाजूलामोकळी जागेमध्ये गटाराचे पाणी योग्य पद्त्तधतीने जात नसल्याने  त्या ठिकाणी गटारात दोन - दोन फुट पाणी साचून  डासांची पैदास वाढली असून, गटारातील  पाण्याच्या दुर्गधीने येथील  स्थानिक नागरिक व येणारे जाणारे प्रवाशी हैराण झाले आहेत. 
             कामशेत या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे नागरिक ह्याच रस्त्याच्या कडेला असलेल्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामध्ये वाहने पार्क करतात. 
             या ठिकानाचे सांडपाणी योग्य पद्धतीने काढून देण्याची मागणी येथील नागरिक करीत आहे. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहे.  
                  या ठिकाणी  पाऊसाळा पासून तर आज पर्यंत रस्त्यालगत पाणी साचले आहे. याच गटारामध्ये पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे व त्या सांडपाण्यात डासांची पैदास वाढून परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. या ठिकाणी जास्त पाणी साचल्याने ते पाणी थेट रस्त्यावर येते. जाता येताना वाहनाच्या टायरने थेट पाणी नागरिकांच्या अंगावर उडते. शिवाय प्रवासी, दुकानदार व रहिवाशाना याच गटाराच्या दुर्गधीयुक्त पाण्यातून  ये- जा करावी लागत आहे. त्यामुळे येथील रहिवासी, दुकानदार त्रस्त झाली आहे. 
       प्रशासनाने येथील साचलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने उपाय योजना करावी अशी नागरिकांची  मागणी आहे. 
छायाचित्र :कामशेत येथील जुना पुना- मुंबई रस्त्यालगत (नाणे रोड रस्त्याच्या बाजूला)  असलेला सांडपाण्याचा ठिपलेला फोटो

Post a Comment

0 Comments