Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

सिमेंटच्या जंगलामध्ये कावळ्यांचे थवे झाले नाहीसे ...!

मावळ जनसंवाद :-  
                मावळ तालुक्यात व शहरी भागात तोलेजन इमारती उभ्या राहिल्या आहे. झाडांचे अस्तित्व नाहीसे झाले असून त्यामुळे  कोणत्याही जातीचे पक्षी दिसेनासे झाले आहेत. इतर' पक्ष्यासह सध्या कावळा हा पक्षीच  दिसेनासा झाल्याने पिंडाला त्याचा स्पर्श होण्याकरिता  प्रतिक्षाच करावी लागत असल्याने चित्र सध्या खेडेगावात सोडून  शहरातील अनेक ठिकाणच्या  घाटावर पहावयास मिळत आहे. 
         अक्षय तृतीयेला किंवा त्यापूर्वी येत असलेल्या चैत्र अमावास्येला कावळ्याच्या घासाला खूप महत्व असते. यातील धार्मिकता बाजूला ठेवली तर कावला हा पक्षी  दिसेनाशे वास्तव आहे. सिमेंटच्या जंगलामुळे कावळ्याची संख्या कमी झाली आहे. हे चित्र आपल्याला पहावयास मिळते. 
                शहरातील वाढणाऱ्या सिमेंटच्या जंगलामुळे आज  कावळ्यांना  घरटे तयार करायला वृक्ष सापडणे कठीण झाले आहे- शहरामध्ये होणारे भव्य बिल्डींग , महामार्गावर असलेले ४०० वर्षापूर्वीची झाडे तोडल्यामुळे कावळ्याचे घरटे दिसेनाशे झाले आहे.. पाच वाजले कि कावळ्यांचे थवे झाडावर बसले असते . परंतु  आता शहरामध्ये वृक्ष नसल्याने कावळ्यांनी जगायचे तरी कसे असा प्रश्न नागरिकांना पडत तर नसावा असे मत व्यक्त होत आहे. झाडांचे संवर्धन केले नाही तर  भविष्यात कावळा हा पक्षी पुस्तकात पहावयास मिळेल हे वास्तव आहे. झाडे लावणे झाडे जगवणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त होत आहे. 
                         प्रतिक्रिया :-  प्रशासनाने शहरातील पक्षी जतन करायचे असतील तर मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याची खरी गरज आहे. असे मत युवा उद्योजक  गणेश जालिंदर जाधव यांनी  मावळ जनसंवाद दिली आहे.





Post a Comment

0 Comments