मावळ जनसंवाद :-
मावळ तालुक्यात वाढती गुन्हेगारी , चोऱ्या, दरोडे, तसेच वाहनांची तोडफोड आदि वाढत्या घटनांमुळे दहशतीचे वातावरण आहे. त्यासाठी मावळ तालुक्यातील गावागावात चौका - चौकात वर्दळीच्या रस्त्यावर, शाळा आदी महत्वाच्या ठिकाणी सी सी टी व्ही बसविण्याची मागणी होत आहे. तसेच मावळ तालुक्यात मोठया प्रमाणात वाहन तोडफोडीच्या घटना, चोऱ्या मुलीची छेडछाड, खून दरोडे, आदी इतर घटना ह्या घडतच आहे. आदी गुन्हे रोखण्यासाठी मावळ तालुक्यात शहर असो खडेगावमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यास बऱ्याच गुन्हांवर नियंत्रण बसू शकते.
आजच्या स्थितीला खेडेगावांमध्ये सना- सुदीला , गणेशोत्सक, दसरा, दिवाळी, निवडणूक, यात्रा, मध्ये मोठया प्रमाणात भांडणे होतात तसेच लग्न वरातीमध्ये भाडणे होतात. आदी ठिकाणी वाहनाच्या काचाही हि फोडल्या जातात.
मावळ तालुक्यात शहरामध्ये चौक- चौकामध्ये, महाविद्यालय, बाजार पेठामध्ये, वर्दळीच्या रस्त्यावर सी सी टी व्ही कॅमेरे बसविले आहे. प्रशाशनाने खेडे गावामध्ये शहराप्रमाणे सी सी टी व्ही कॅमेरे बसवावे. शहराचा विकासाबरोबर खेड्याचा विकास महत्वाचा आहे.
प्रशाशनाने सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यास मावळ तालुक्यातील शहरामध्ये असो अथवा खेडेगावांमध्ये तसेच वर्दळीच्या ठिकाणी घडणाऱ्या गुन्हांवर नियंत्रण येऊ शकते. अशी मावळ तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे.
0 Comments