Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

मावळ तालुक्यात बाल कामगाराच्या संख्येत प्रचंड वाढ...!



मावळ जनसंवाद :-
                मावळ तालुक्यातील पवन मावळ, नाणे मावळ, तसेच अंदर मावळ अशी तीन मावळ मिळून मावळ तालुक्यात आहे. मावळ तालुक्याची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या  ३७७५५९ अशी आहे. 
       मावळ तालुक्यात  लोणावळा, खंडाळा, तळेगाव, कामशेत, वडगाव, पवनानगर, सोमाटणे, टाकवे ब्रु, वेहरगाव तसेच जास्त रहदारीच्या ठिकाणी  हॉटेल मध्ये, मोटार गॅरेज, वीटभट्टी तसेच बेकरी, छोट्या, वाटर पार्क अशा ठिकाणी मोठया प्रमाणात काम करतात. हे बाल कामगार हे १८ वर्षाखाली आहे. ह्या बालकामगार च्या चेहऱ्यावरती मुशीर सुद्धा नाही ही वस्तुस्थिती आहे.
         मावळ तालुक्यात परराज्यातून अनेक कामगार कामाच्या शोधात मावळ तालुक्यात येतात.काही ठिकाणी नोकरी करण्यासाठी, लोणावळा, तळेगाव, कामशेत ह्या ठिकाणी चौका - चौकात उभे असतात. शिवाय मिळेल ते काम करण्यासाठी तयारी असतात. मात्र आजच्या घडीला मागील तीन वर्षापुर्वीची नोटबंदी तसेच महागाई मोठया प्रमाणात असल्याने कौटूंबिक गरजा पूर्ण होण्यासाठी मुलांना हॉटेल, दुकान व्यवसाय, टायरच्या दुकानात, रसाच्या दुकानात कामाला लावण्यासाठी प्रवूत्त करतात. ज्या मुलांना शिक्षण घेण्याचे वय असते. त्या वयात ती मुले दुकानात काम करतात. 
      महाराष्र्ट शासनातर्फे बालकांची शैक्षणिक व सामाजिक परिष्ठती सुधारण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु केवळ कुटुबांची बिकट व आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे आपल्या कुटूंबाला थोडा फार हातभार लागावा म्हणून ज्या वयात शिक्षणाचे धडे गिरवायचे असते. त्याच वयात हॉटेलमध्ये, सायकल दुकान,मोटार गॅरेज, किराणा दुकानात, बेकरी अन्य ठिकाणी  बालकामगार काम करतात. 
        शिवाय दुकानदार हॉटेल तसेच अन्य व्यवसायधारक पौढ व्यक्तीला कामावर विशेषतः ठेवत नाही. कारण ती पौढ व्यक्ती दिवसभर काम करून संध्याकाळी ४०० ते ५०० रुपये हजेरी घेतात.त्याच ठिकाणी बालकामगार १०० ते १५० रुपये हजेरी घेतात. ह्या स्वस्त हजेरी असल्यामुळे व्यवसाय धारक बालकामगार यांना कामावर ठेवण्यासाठी पसंती देतात. 
           ज्या वयात शिक्षणाचे धडे गिरवले जातात. त्या वयात ज्या हाताने किराणा माल, चहाची किटली, टायरला हवा,वीटभट्टी, हॉटेल अदी ठिकाणी बालकामगार काम करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते. 
         प्रशासनाने ज्या ज्या ठिकाणी बाल कामगार काम करीत असेल त्या ठिकाणी दुकान व्यावसाय तसेच अन्य ठिकाणी बाल कामगार काम करीत असेल त्या ठिकाणी कारवाई करावी. अशी मागणी नागरिक करीत आहे. तसेच बाल कामगार काम न करता त्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी उपाय योजना करावी. अशी मागणी नागरिक उपष्ठीत करीत आहे.  

प्रतिक्रिया :-  बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या हक्क असताना देखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती त्या घटनेकडे पाठ फिरवीत आहे. असे मत युवा उद्योजक सोपान येवले यांनी मावळ जनसंवादला दिले.

    

Post a Comment

0 Comments