Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

मावळात मुहूर्त फक्त नावालाच पारंपरिक पद्धतीने साधेपणात पार पडतात विवाह सोहळे...

मावळात मुहूर्त फक्त नावालाच
पारंपरिक पद्धतीने साधेपणात पार पडतात विवाह सोहळे
नाणे मावळ, दि. १० :
मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये लग्नासाठी मुहूर्त पाहण्याची प्रथा केवळ नावालाच असल्याचे चित्र दिसून येते. इतर भागात लग्नासाठी ठराविक वेळ आणि मुहूर्त पाहूनच विवाह लावण्याची परंपरा असली, तरी मावळ भागात वधू-वर पक्षाच्या सोयीप्रमाणे आणि गावातील वडीलधाऱ्या मंडळींच्या उपस्थितीत विवाह सोहळे पार पडतात.
लग्नासाठी मुहूर्त ठरवला जातो, मात्र त्या क्षणालाच विवाह लावला पाहिजे अशी सक्ती येथे नसते. काही वेळा अर्धा ते पाऊण तास उशीर झाला तरी गावातील मंडळींच्या उपस्थितीत शांतपणे आणि पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पाडला जातो.
मावळातील ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून साधेपणाने आणि पारंपरिक पद्धतीने विवाह लावण्याची परंपरा जपली जात आहे. लग्नाच्या वेळेच्या बंधनापेक्षा कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि गावकरी एकत्र येऊन आनंदात विवाह सोहळा पार पाडण्याला अधिक महत्त्व दिले जाते.
या परंपरेमुळे विवाह सोहळे साधेपणाने आणि कमी खर्चात पार पडतात, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. बदलत्या काळातही मावळ भागातील ही पारंपरिक पद्धत आजही कायम असल्याचे दिसून येत आहे


संपर्क :
श्री. अतुल तुकाराम चोपडे पाटील
मो. ९८२३९३५४२४

Post a Comment

0 Comments