मावळ जनसंवाद:-अलीकडच्या काळात बाजारात सहज उपलब्ध होणारे “स्टिंग” हे एनर्जी ड्रिंक लहान मुलांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनले आहे. रंगीत बाटली, गोड चव आणि जाहिरातींचा प्रभाव यामुळे शाळकरी मुले हे पेय पिण्यास प्रवृत्त होत आहेत. तथापि, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अशा एनर्जी ड्रिंकमध्ये असलेले जास्त प्रमाणातील कॅफिन, साखर आणि कृत्रिम पदार्थ लहान मुलांच्या आरोग्यास घातक ठरू शकतात. दीर्घकाळ याचे सेवन केल्यास हृदयाचे विकार, निद्रानाश, तसेच तणाववाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नाणे मावळ परिसरात काही शाळकरी मुले हे पेय नियमितपणे घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालकांनी आणि शाळांनी तत्काळ खबरदारी घेऊन मुलांमध्ये या ड्रिंकबाबत जागरूकता निर्माण करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


0 Comments