मावळ जनसंवाद:- नाणे मावळ परिसरात वोडाफोन अन्य कंपन्यांची रेंज केवळ घरावर गेल्यानंतरच घेत आहे. अनेकदा मोठे झाड, इमारतीचा आसरा घ्यावा लागत आहे. अभ्यासासाठी अनेकदा गावाबाहेरील ज्या ठिकाणी रेंज त्या ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. सध्या स्थितीला कोणत्याही मोबाईल कंपनीची रेज आवस्थित येत नाही रेंज येण्यासाठी डोंगर टेकडीवर अथवा उंच ठिकाणे जावे लागत आहे. काही ठिकाणी घराच्या टेरेस वर मुले एकत्र बसून मोबाईलवर शालेय विद्यार्थी अभ्यास करताना दिसत आहे.तर काही व्यक्ती इतरांचे संपर्क होण्यासाठी फोन वरती चर्चा करताना दिसत आहे. मागील काही वर्षात शासनाच्या विविध योजना ह्या मोबाईल लिंक करण्यात आलेला आहे. त्यासाठी मोबाईल हा कंपल्सरी अनिवार्य आहे. रेंज नसल्यामुळे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा निर्माण करण्यासाठी अडथळा होत आहे त्याला कारण म्हणजे रेंज ही वस्तुस्थिती असून ह्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.रेंज नसल्यामुळे स्थानिकांशी संपर्कात आजही मोठी कसरत करावी लागते.विविध मोबाईल कंपन्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण विभागात प्रशासनाला अनेक प्रकारच्या योजनस दाखवून आकर्षित केले जात आहे. मागील चार वर्षापासून नाणे मावळ ही मोठी समस्या निर्माण झाली आहे.काही ठिकाणी दोन किलोमीतर अंतरापर्यंत येत आहे. यापुढे येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. (रेंज येत नसल्यामुळे जास्त दिवसाचे महागडे रिचार्ज मारावे लागत आहे.त्या मुळे महिन्याबरचे रिचार्ज वाया जात आहे.शिवाय रिचार्ज किंमत तीस दिवसाची ३०१ एवढे असून तीही सर्वसामान्यांना परवडत नाही. प्रशासनाने नाणे मावळातील विविध गावांमध्ये ज्या ठिकाणी रेंज येत नाही त्या ठिकाणी त्वरित मोबाईल टॉवर उभारण्याची स्थानिकांची मागणी आहे.
0 Comments