Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

शेतकरी तरुणांच्या विवाहात अडथळे शेती व्यवसायामुळे मुलीच्या आई-वडील यांचा नकार; मावळ तालुक्यातील चित्र

 मावळ जनसंवाद:मावळ तालुक्यातील अनेक शेतकरी तरुणांना शेती व्यवसायामुळे विवाह जुळवण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेती हा पारंपरिक व्यवसाय असूनही, अनेक कुटुंबे आपल्या मुलीचा विवाह शेतकरी तरुणाशी करण्यास संकोच करतात. शेती व्यवसायामुळे तालुक्यात मुलीच्या आई- वडिलांचा नकार सर्रास दिसून येत आहे. यामागे अनिश्चितता, अस्थिरता शेतीतील आर्थिक आणि शहरीकरणामुळे बदललेली मानसिकता ही मुख्य कारणे आहेत. ग्रामीण भागातील शेती करणाऱ्या मुलांना घर, बागायती शेती, गाड्या, जनावरांचा गोठा, घरी सुखसोयी असूनही लग्नासाठी मुलगी सहजासहजी मिळत नाही, अशी परिस्थिती तालुक्यातील गावा-गावांमध्ये सध्या दिसत आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्न अनिश्चित असल्याने, अनेक पालक आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित राहावे म्हणून शेतकरी तरुणाशी तिचा विवाह करण्यास नकार देतात. तसेच, शहरीकरणाच्या प्रभावामुळे तरुण-तरुणींच्या अपेक्षांमध्ये बदल झाला आहे, ज्यामुळे शेती करणाऱ्या तरुणांना विवाह जुळवण्यात अडचणी येत आहेत. प्रत्येक तरुणाचं लग्न व संसार याबाबतचं आपलं स्वप्न साकार व्हावं, अशी अपेक्षा असते. परंतु सरकारी नोकरी नाही, बिझनेस शेती आहे; परंतु लग्न जमत नाही. या समस्येवर उपाय म्हणून शेतकरी तरुणांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीसोबत इतर पूरक व्यवसायांचा विचार करावा लागणार आहे. समाजानेही शेती व्यवसायाचे महत्त्व ओळखून, शेतकरीतरुणांना समान संधी देण्याची गरज आहे. मुलीच्या आई-वडिलांच्या मते, शेतीतून मिळणारे उत्पन्न अनिश्चित असल्याने आणि ग्रामीण जीवनातील कष्टामुळे मुलीचे भविष्य असुरक्षित होऊ शकते. त्यामुळे शेतकरी तरुण उच्चशिक्षित असला, तरीही त्याला नकार देण्याचे प्रमाण वाढले आहे.लग्न न झाल्याने अनेक तरुण व्यसनाधीन मुलींचा घटलेला जन्मदर, मुलींसह त्यांच्या पालकांच्या अवास्तव अपेक्षा, शेतकरी कुटुंबातील मुलाला नकार, सरकारी नोकरीचा अट्टाहास, बेकारी आदी अनेक कारणांमुळे मावळ तालुक्यातील हजारो तरुण विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक तरुण मनावर आलेला ताण घालवण्यासाठी व्यसनांचा आश्रय घेताना दिसत आहेत. नोकरी नसणे, लग्न न होणे, बेरोजगारी, दारिद्रय, प्रेमभंग अशा विविध कारणांमुळे ते व्यसनांच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. व्यसनाधीनतेमुळे केवळ तरुणांचेच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबांचेही जीवन प्रभावित होते. शारीरिक आजार, आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक तणाव यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे समाजाने या समस्येकडे गांभीयनि पाहून तरुणांना मानसिक आधार देतानाच, रोजगाराच्या संधी आणि विवाह जुळवण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.

          व्यसनमुक्तीसाठी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांमध्ये तरुणांचा सहभाग वाढवून त्यांना व्यसनांपासून दूर ठेवणे शक्य आहे. तसेच, कुटुंबीयांनी आणि समाजाने तरुणांच्या भावनिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.


Post a Comment

0 Comments