मावळ जनसंवाद: सिमेंटच्या जंगलामुळे तसेच वाढते प्रदूषण होत असल्यामुळे शहरांमधून चिमण्या हद्दपार होत आहेत. खेडेगावात काही ठिकाणी चिमण्या तूरलत प्रमाणात दिसत आहे.घर बांधताना चिमण्यांसाठीही इवलीशी जागा सोडून त्यांची व्यवस्था लावली तर सर्वत्र चिमण्यांचा किलबिलाट पुन्हा सुरू होईल, असे कळकळीचे आवाहन पक्षीमित्रांनी केले आहे.२० मार्च हा दिवस आपण जागतिक चिमणी दिवस. नाशिकला चिमणी संवर्धनासाठी २०१० मध्ये हा दिवस पाळण्याची सुरुवात झाली. गेल्या ३० वर्षांत चिमण्यांची संख्या कमालीची रोडावली आहे. शहरातून चिमण्या गायब होण्याचे प्रमाण ७० टक्के, तर ग्रामीण भागात ४० टक्के चिमण्या जेथे नाहीत तो प्रदेश पर्यावरणाच्या दृष्टीने निरोगी मानला जात नाही. आपण आपल्या घराच्या बाहेरील भागामध्ये भितींमध्ये दोन तीन इंची छिद्र करून ठेवले तरी तिथे चिमण्या आनंदाने राहतील. घराच्या अंगणात स्वदेशी प्रजातीची झुडपे झाडे लावल्यास चिमण्यांना निवारा मिळू शकेल असे पक्षी मित्र दक्ष काटकर यांनी माहिती दिली.
नैसर्गिक कीटकनाशक चिमणी मिश्राहारी आहे. गवताचे बी, धान्य कचरा, तांदूळ, ज्वारी, बाजरी च्या कानसा मधील दाणे, घराच्या बाजूला पडलेले खरकटे अन्न, कचराकुंडीतील किडे, परसबागेतील झाडांवरच्या अळ्या, कीड, पाकोळ्या, पतंग तसेच पिकांमधील कीटक, टोळ, नागतोडे खाऊन चिमणी आपल्याला मदत करते. चिमणी नैसर्गिक कीटकनाशक आहे, म्हणून मानवासाठी महत्त्वाची आहे. चिमण्या वाढवने सवर्धन करणे ही काळाची गरज आहे.
0 Comments