मावळ जनसंवाद :-
गगन न्युलाईफ सिनिअर सिटीझन काँप्लॕक्स कुसगाव कामशेत येथे वसंत पंचमी विविध उपक्रमांनी सादर करण्यात आली. वसंत पंचमी निमित्त सरस्वती पुजन कार्यक्रम अतिशय उत्साहमय वातावरणात पार पडला. यावेळी जयश्री सुब्रम्हण्यम यांनी आपल्या सुरेल आवाजात सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरवात केली. दरम्यान वसंत पंचमी या दिनाचे औचित्य साधून काँप्लॕक्स मधील काही कलाकार, चित्रकार मंडळींनी आपल्या हाताने बनवलेल्या काही पेंटीग,ड्रॉइंग व विणकाम यांचे प्रदर्शन देखील अनुभवायास मिळाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन सिमा शिरोडकर व डॉ.अजित शिरोडकर या दांपत्याच्या शुभहस्ते करण्यात आले. या वयात देखील इतके सुरेल, सुबक व देखणी कलाकृती पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या हाताने बनविलेल्या वस्तु व चित्रांच्या प्रदर्शनात मिनल शहा, नुतन देशमुख, उर्मिला दिघे, शोभा प्रधान, दिनेश रागणेकर, जया रामनाथन, मिरा सावरा, सिमा शिरोडकर, सुहासिनी देशपांडे, मंजू शर्मा, विनिता खरे, झोमोया व कालिंदिनी फर्नांडीस आदींनी आपला सहभाग नोदवून आपल्या कलागुणांचा अविष्कार सादर केला.
प्रसंगी फेस्टिव्हल कमिटी मेंबर मिलन घोलबा यांनी सांगितले की, कमिटीच्या पुढाकारातून या काँप्लॕक्स मध्ये दरवर्षी गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, नवरात्री, संक्रात, होळी, ख्रिसमस व ईद यांसारखे सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. कमिटी मधील बेला मंडेलिया, मिलन घोलबा, कुसुम वालिया, मिरा सावरा आदीं सभासदांसह येथील कर्मचारी अल्गर फर्नांडीस व त्यांच्या सहकाऱ्यानी देखील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष प्रयत्न केले.
सायंकाळी भजनसंध्या कार्यक्रम देखील आयोजित केला गेला होता. यावेळी एकाचढ एक मराठी, हिंदी व गुजराथी भजनांनी रसिक श्रोत्यांची मने जिंकली. संतोष लालगुडे यांनी अतिशय सुरेल व सुरेख हार्मोनियम वादनकाम करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचा शेवट डॉ.सुरेश दिवाडकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुश्राव्य भैरवीने झाला.
छायाचित्र :-गगन न्युलाईफ सिनिअर सिटीझन काँप्लॕक्स वसंत पंचमीचा सण साजरा करताना ठिपलेला फोटो



0 Comments