Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

plz See the ०1 attachments  
           नाणे मावळ, दि.1:-

गोल्डन ग्लेड्स च्या विद्यार्थ्यांना सहलीत इतिहास, संस्कृतीचा अनुभव


 शिक्षण म्हणजे केवळ वर्गातील पुस्तकापुरते मर्यादित नसून, प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान प्राप्त करणे हेच होय. या उददेशाने गोल्डन ग्लेडस माध्यमिक विदयालय, करंजगाव यांच्या वतीने यंदा रविवारी एक अत्यंत सुंदर, प्रेरणादायी व संस्मरणीय अशी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. करंजगाव ते किल्ले रायगड अशा प्रकारे अतिशय नियोजनबद्ध, सुरक्षित आणि आनंददायी पद्धतीने ही सहल पार
पड़ली. ही सहल म्हणजे केवळ प्रवास नव्हता, तर ती इतिहास, संस्कृती, निसर्ग,
शिस्त, सहकार्य आणि राष्ट्रप्रेम यांचा जिवंत अनुभव होता. सहलीचे प्रमुख
अनिल सातकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि विद्यालयाच्या सर्व
शिक्षकवृंदाच्या मोलाच्या सहकार्यामुळे ही सहल यशस्वी ठरली. किल्ले रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा, स्वराज्याच्या संकल्पनेचा आणि भारतीय इतिहासातील सुवर्णकाळाचा साक्षीदार आहे. रायगडावर पाऊल ठेवताच त्यांच्या चेहन्यावर कुतूहल, अभिमान स्पष्ट दिसत होता. राजदरबार, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी, बाजारपेठ अशा ऐतिहासिक स्थळांना भेट देताना विद्यार्थांना केिवळ माहितीच मिळाली नाही, तर इतिहास जिवंतपणे
अनुभवण्याची संधी मिळाली अशी माहिती सहल प्रमुख अनिल सातकर
यांनी दिली.

या सहलीदरम्यान विद्यार्थ्यानी अतिशय शिस्तबद्ध व जबाबदार वर्तन केले.
शिक्षकांच्या सूचनांचे पालन, वेळेचे भान, स्वच्छता आणि परस्पर सहकार्य
यामुळे सहल अधिक सुखद ठरली. ही बाब विद्यालयासाठी अत्यंत
अभिमानास्पद आहे. समूहभावना जोपासली. सहलीदरम्यान कोणताही
अनुचित प्रकार घडला नाही, याचे श्रेय विद्याथ्थ्याच्या सुसंस्कृत वागणुकीला
आणि शिक्षकांच्या सतर्कतेला जाते. विदयाथ्र्यांनी एकमेकांना मदत केली,
मोठ्यांचा आदर राखला अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूराव
नवले यांनी दिली.

सहलीदरम्यान सुरक्षित, शिस्तबद्ध, जबाबदारीपूर्वक प्रवास झाला. वाटेत सात्विक, स्वच्छ, पौष्टिक जेवणाचा आस्वाद सर्व विद्यार्थ्यांनी घेतला. सहलीच्या यशासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षकवृंदाचे, एसटी डेपोच्या वाहनचालकांचे, कर्मचाच्यांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानण्यात आले.

रायगड : स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड पाहण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.




नाणे मावळ :- श्री.अतुल तुकाराम चोपडे पाटील :- ९८२३९३५४२४

Post a Comment

0 Comments