मावळ जनसंवाद, दि.21:-ग्रामदेवतेच्या यात्रेनिमित्त कोंडीवडे (नाणे मावळ) येथे पारंपरिक थाटामाटात आयोजित करण्यात आलेल्या छकडी स्पर्धेला गावकऱ्यांचा आणि परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. मावळ तालुक्याच्या परंपरेला साजेश्या या स्पर्धेमध्ये विविध तगड्या आणि सजवलेल्या बैलजोड्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.
तीव्र स्पर्धेत आपल्या दमदार धावणीने सर्वांचे लक्ष वेधून घेत ‘भारत–बगिरा’ या बैलजोडीने अप्रतिम कामगिरी करत ‘घाटाचा राजा’ हा प्रतिष्ठेचा किताब पटकावला. स्पर्धेदरम्यान मैदानावर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात या बैलजोडीचे विशेष कौतुक केले.
छकडी स्पर्धेमुळे यात्रेला पारंपरिक रंग, उत्साह आणि स्पर्धेची रोमांचकता लाभली. गावातील तसेच बाहेरील बैलधनी, शौकिन आणि प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला.
नाणे मावळ :- श्री.अतुल तुकाराम चोपडे पाटील :- ९८२३९३५४२४


0 Comments