मावळ जनसंवाद: इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉटस् अॅप हे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म जीवनाचा अविभाज्य भाग बनले. आबालवृद्धही सोशल मीडियाच्या मायाजालामध्ये गुरफटले. सोशल मीडियावर आवश्यक निर्बंध नसल्याने बहुतेकदा लोकांना विकृतीकडे घेऊन जाणाऱ्या पोस्ट येथे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे लहान मुलांच्या हातात सोशल मीडिया चे व्यसन लागल्याने मुले तासन्तास येथे वेळ घालवतात. या चुकीच्या 'कंटेट' मुळेच मुलांमध्ये ही विकृती पसरत चालली आहे. लहान मुले चिडचिड करीत असतात. सोशल मीडिया व मित्रमंडळी, नातेवाईकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला जातो, तर मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन म्हणूनही सोशल मीडियाकडे पाहिले जाते. सर्वसाधारण व्यक्ती दिवसातील चार ते पाच तास सोशल मीडियाचा वापर करते. काही व्यक्ती अगदी तहान-भूक विसरून सोशल मीडियाच्या आभासी युगामध्ये हरवून जातात. जगभरातील लाखो लोक सोशल मीडियामध्ये कंटेट टाकत असतात, तर कोट्यवधी लोक हा कंटेट पाहात असतात. सोशल मीडियावर म्हणावी तशी बंधने नसल्याने अनेकवेळा चुकीचा कंटेट पोस्ट केला जातो. यामध्ये गुन्ह्यांना प्रवृत्त करणे, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणे यासह अश्लीलता पसरवणाऱ्या कंटेटचा समावेश असतो. सोशल मीडिया वापरणाऱ्या लहान मुलांचे प्रमाण मोठे आहे. ही मुले काय पाहतात, याचा पत्ता त्यांच्या पालकांना नसतो.
दुसरीकडे सोशल मीडियातील झगमगाटामध्ये मुले हरवून जातात आणि त्यांचे भविष्य अंधारमय बनते ही वस्तू स्थिती निर्माण झाली आहे.शासनाने 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालन्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी पालकांतून पूर्वीपासून केली जात आहे.(रील्स पाहतात तासन् तास पाहणाऱ्यांना खिळवून ठेवतील अशा रिल्स तयार केल्या जातात. त्यामुळे रिल्स पाहणा-यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही जण दिवसातील 3-4 तास यामध्ये घालवतात. अनेक रिल्स गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे, तसेच अश्लीलता पसरवणाऱ्या असतात. त्यामुळे अशा रिल्सवर बंधन आणणे गरजेचे आहे. काही सोशल मीडिया साईट 16 वर्षांखालील मुलांना वापरास परवानगी देत नाहीत, मात्र मुले आपल्या पालकांचा मोबाईल घेऊन सोशल मीडियाचा वापर करतात.)
0 Comments