Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा प्रभाव

 मावळ जनसंवाद: मावळ तालुक्यात उसाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, खोडवा पिकानंतर शेतकरी ओला चारा लागवडीकडे वळला असल्याचे दिसत आहे. उसाचे खोडवा पीक तोडणी झाल्यानंतर शेतकरी रोटर मारून शाळू, मका पेरणीकडे वळत असल्याचे दिसत आहे. पुढे दोन ते तीन महिने उन्हाळ्याचे दिवस आहेत. ऐन उन्हाळ्यात जनावरांना ओला चारा मिळावा यासाठी शेतकरी शाळू, मका यासारख्या पिकांची पेरणी करताना दिसत आहेत.सध्या पेरणीसाठी बैलजोड्यांचा तुटवडा भासत असल्याने यंत्राद्वारे शाळू, मका पेरणी करण्यासाठी शेतकरी वर्गातून प्राधान्य दिले जात आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार शेती व्यवसायामध्ये यांत्रिकीकरणाचा शिरकाव असल्याचेच चित्र दिसत आहे. झाला मावळ तालुक्यात ऊस, कांदा, मका, भुईमूग, गहू आदी पिकांबरोबरच भाजीपाला पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, मजुरांच्या टंचाईने शेती व्यवसाय अडचणीत येत आहे. शेतमजुरी करताना वाढत्या महागाईला तोंड देणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतमजुरांचा इतर ठिकाणी मजुरी करण्याकडे कल वाढला आहे. परिणामी, शेतीच्या कामांसाठी शेतमजुरांचा तुटवडा भासत आहे.

आधुनिकीकरणाचा शिरकाव शेती व्यवसायामध्येही होऊ लागला असून टोकन करणे, लावण करणे, पिकांना भर लावणे, काढणी, कापणी आदी कामे यंत्राद्वारे केली जाऊ लागल्याने यंत्रांना मागणी वाढली आहे. मजुरांच्या तुटवड्यावर यांत्रिकीकरणाचा तोडगा निघाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असला तरीही, वाढती महागाई व इंधन दरवाढीचा फटका शेतीला बसू लागला आहे.

Post a Comment

0 Comments