Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

रानफुले, रानफळे देतात सुखद अनुभव : राने लागली सजू

  मावळ जनसंवाद: मावळ तालुका म्हणजे मिनी महाबळेश्वर, कोकण मानले जाते. आता वसंत ऋतूला सुरुवात झाली आहे. उन्हाचा पारा चढत असताना रानावनात मात्र उन्हाळी रानफुलांचा, फळांचा बहर सुरू झाला आहे. उन्हाळ्यात जंगलात विविध प्रकारची फुले, फळे बहरून येतात. चैत्र महिन्याच्या तोंडावरच झाडांना पालवी फुटली असून या पालवीतच बहावा, निवडुंग, गुलमोहर, पळस, चाफा, सावर इत्यादी झाडांची फुले, तर आंबा, काजू, फणस, बोरे इत्यादी रानफळांची झाडे बहरली आहेत. वृक्षांना मोठ्या प्रमाणात फुलांचा, फळांचा बहर आला आहे. रानावनात झाडांना पालवीबरोबरच आलेला हा बहर निसर्गप्रेमी, पर्यटक यांच्यासाठी आकर्षण ठरू लागला आहे. उन्हाळ्याच्या काहिलीत बहरणारी रानफुले, रानफळे निसर्गाची शोभा वाढवित आहेत. उन्हाळ्यात झाडांची पानगळ, उन्हाने होणारी काहिली व भकास वाटणारे रान असे चित्र सर्वत्र दिसते. मात्र याच ऋतूत रानातील अनेक फळझाडे, फुलझाडे फुलून येतात. यातून उन्हाळ्याच्या दिवसात रानाची शोभा वाढत असून रानावनात झाडांना उन्हाळी रानफुलांचा बहर आलेला दिसत आहे.

        मावळ तालुक्यातील डोंगरकपारीत, रस्त्यांच्या दुतर्फा, शेतशिवारात फुलांचे गुच्छ, फळे आली आहेत. उन्हाळी रानफुलेबहावा, निवडुंग, गुलमोहर, पळस, चाफा, सावर तसेच उन्हाळी रानफळे आंबा, काजू, फणस, बोरे, करवंद, जांभूळ यांनी राने सजू लागली आहेत.

(उन्हाळा वाढत असताना रानात असंख्य प्रकारच्या झाडा-वेलींना फुलांचा बहर आला आहे. अनेक प्रकारची फळे आली आहेत. ही फुले पाहणे व फळांचा आस्वाद घेणे आनंददायी ठरते. रानात बहरलेली ही फुले पाहणे अतिशय आनंदाचे आहे. यानंतर काही दिवसांनी पावसाळा सुरू होईल. पावसाळा जवळ आल्याचे उन्हाळी रानफुले संकेत देतात अशी माहिती वृक्षप्रेमी ॲड. आण्णासाहेब राऊत यांनी दिली)


Post a Comment

0 Comments