Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

मावळ तालुक्यात चाऱ्याची टंचाई वैरणीला सोन्याचा भाव; पशुधनपालक शेतकरी हतबल

मावळ जनसंवादमावळ तालुक्यात पश्चिम भाग मध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर नद्या नाले, झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा मावळ तालुक्यात पडतो. त्यामुळे चाऱ्याची कमतरता शक्यतो भासत नाही. परंतु, यावर्षी मात्र तालुक्यात चारा टंचाईचे संकट मार्चच्या सुरुवातीपासूनच भेडसावू लागले आहे. ओल्या चाऱ्याची देखील कमतरता भासू लागल्याने उन्हाळा सुरू होण्याअगोदरच चऱ्याचे सुक्या दर गगनाला भिडल्याने दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.सध्या साखर कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत, तर काही कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. जनावरांना मिळणारे उसाचे वाढे कमी होऊन लागले आहे. त्यामुळे ओला चारा मिळत नाही. याचा परिणाम दूध उत्पादनावर होत आहे. यामुळे भेडसावत असलेल्या चाराटंचाईने शेतकरी हतबल झाला आहे, तर ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.यंदा पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे मावळ तालुक्यात ऊसपट्ट्यात परिस्थिती अधिक गंभीर बनली होती, तर परतीच्या व अवकाळी पावसाने गवताची वाढ झाली नाही. रब्बी हंगामात केलेली पिके काही अपवाद वगळता पाण्याअभावी वाया गेली आहेत. परिणामी, चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनत चालला असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. जनावरांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्याच शेतातील उभा ऊस कापून घालण्यास सुरुवात केली आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने तसेच रब्बीचीही काढणी, मळणी सुरू असल्याने शेतकरी स्वतः साठी आधी वैरणीची तजवीज करत आहेत.

        रब्बीचे क्षेत्रही जवळपास ५० टक्के कमी झाले आहे. परिणामी सुका चाराही उपलब्ध झालेला नाही. शेतीवरच दूध व्यवसाय अवलंबून आहे. आता चाऱ्याअभावी यात कमालीची घट झाली आहे. ज्यांचे उसाचे जास्त क्षेत्र आहे, त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून हा ऊस कापून जनावरांना घालत, वैरणीला विकला होता, तर अनेकांचे ऊसक्षेत्र कमी असल्याने त्यांच्या व्यवसाय कमालीची घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. गवताला महत्त्व आले असून गवत ७ ते ८ हजार रुपये शेकडा झाले आहे, तर शाळू कडवा ३ ते ४ हजार रुपये शेकडा झालेला आहे. अजूनही दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

(खाद्यांचे दर गगनालाअगोदरच खाद्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्याचबरोबर सध्या भेडसावत असलेली ओल्या व सुक्या चाऱ्याची टंचाई, त्यामुळे गतवर्षीपेक्षा दुपटीने दरात वाढ झाली आहे. परिणामी खर्चाचा ताळमेळ घालणे अवघड झाले आहे. निसर्गाने साथ दिली नाही, तर पोटच्या पोराप्रमाणे जपलेले पशुधन मातिमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येण्याचा धोका आहे असे दूध व्यावसायिक खंडू विश्वनाथ गायकवाड पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments