मावळ जनसंवाद:मावळ तालुक्यात रविवारी पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व पाऊस व गारा यामुळे आंबा, पालेभाज्या यांसह काढणीला आलेल्या रब्बी हंगामातील अन्य पिकांचे नुकसान झाले आहे.रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस पडल्यामुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतातील आंब्याच्या झाडांची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली व पालेभाज्या व ज्वारी, बाजरी यांचे नुकसान झाले आहे.वाऱ्यामुळे अनेक झाडे पडली असून, फूलगळ व फळगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. काही ठिकाणी रब्बी, बाजरी, ज्वारीचे पीक भुईसपाट झाले आहे.काही ठिकाणी गोठ्यावरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेले आहेत.तर जनावरांचा चारा हा पूर्णपणे भिजला आहे
प्रशासनाने ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या त्या ठिकाणी पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नाणे मावळतील शेतकरी वर्ग करीत आहे.
0 Comments