Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

उन्हाचा पारा वाढताच रस्त्याच्या दुतर्फा थाटल्या रसवंत्या...

 मावळ जनसंवाद:-मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा एकदम वाढला असून तापमान ४० अंशावर पोचले आहे. वाढत्या उन्हाबरोबर रस्ते देखील तापायला सुरवात झाली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी वेगवेगळे फंडे वापरण्यास सुरवात केली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी आता टोपी, गमजा, गॉगल हेलमेट वापरण्यास सुरूवात केली त्याच बरोबर शीतपेयांना नागरिक पसंती देत असून मुबई पुणे रस्त्यालगत वडगाव, कान्हे,कामशेत रसवंत्यांवर दुपारच्या वेळी रसवंत्यावर गर्दी दिसून येत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत असताना दुसरीकडे चाकरमान्यांना या उन्हाचा फटका बसत आहे, त्यामुळे भरदुपारी या मार्गावरून प्रवास करणरे प्रवासी हे उन्हाची लाही कमी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या रसवंती, ज्यूस सेंटर याचा आश्रय घेत आहेत. वाढत्या महागाई मुले यावर्षी ऊसाचा रस, ज्यूस, गोठी सोडा, नीरा, लिंबू सरबत तसेच आईसक्रिम यांच्या दारात वाढ झालेली असून उन्हाच्या कहाली पासून बचाव करण्यासाठी नागरिकांचे पाय या विसाव्या कडे वळत आहेत.


Post a Comment

0 Comments